फिनिक्स फाऊंडेशनचे `महाआरोग्य शिबिर’ २७ मार्चला होणार! क्षा. म. समाज बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन

फिनिक्स फाऊंडेशनचे `महाआरोग्य शिबिर’ २७ मार्चला होणार! क्षा. म. समाज बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ रविवार २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.३० च्या दरम्यान डॉ. शिरोडकर समारक मंदिर, परळ, मुंबई येथे होणार आहे.

त्यावेळी मोफत रक्ताच्या विविध तपासण्या, डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शस्त्रक्रिया, ई.सी.जी., हाडांची तपासणी, महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती व विविध शासकीय योजनेतून लहान मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येणार आहेत. विषेशतः समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सन्मानिय जितेंद्र लोके अनेकविध समाजसेवेचे उपक्रम राबवित असतात. वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेने हजारो रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले आहेत, आरोग्याचा विविध तपासण्या विनाशुल्क केल्या आहेत. त्याचप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशन वृद्धाश्रम चालविते.

२७ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या `महाआरोग्य शिबिर-२०२२’ संदर्भात माहितीसाठी 8850214373 ह्या मोबाईलवर संपर्क करू शकता!

error: Content is protected !!