`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक मदत रवाना!

`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक मदत रवाना!

नैसर्गिक आपत्ती असो वा ग्रामीण भागात वैद्यकीय मोफत सेवा देण्याची सेवा असो, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप असो वा शाळांना खेळाचे साहित्य देण्याची सेवा असो; नेहमीच रामेश्वर गावचे सुपुत्र श्री. योगेश शशिकांत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच समाजाची सेवा करण्यास तत्पर असते.

आता खेड-चिपळूण पूरग्रस्तांसाठी `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी २००० पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक अन्नधान्य, औषधे, वस्तू पाठविण्यात आल्या. `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ ह्या संस्थेचे समाजपयोगी कार्य कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!