पालघर – शनिवार, दिनांक २० फेब्रुवारी,२०२१ रोजी फिनिक्स फाउंडेशनचे विश्वस्त जितेंद्र लोके यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील एडवन या गावात रूग्णमित्रांची शैक्षणिक सहलीतून वृध्दाश्रम भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
फिनिक्स फाउंडेशन सन २००१ पासून विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून,त्याचाच एक भाग रूग्णसेवा व वृध्दाश्रम आहे.असे आपल्या प्रस्तावनेत धनंजय पवार (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले. वृध्दाश्रमात सेवा देणारे डाॅ.अनिल गणवीर (एम.डी.अॅक्युप॔क्चर) हे गोल्डमिडलीस्ट आहेत. गेल्या ३० वर्षापासून देश-विदेशात अॅक्युपंक्चर कॅम्पचे आयोजन करून, एक लाख रूग्णांना मोफत उपचार केले आहेत. सन १९९३ साली पीएचडी करून श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम जयवर्धने यांच्या हस्ते सन्मानित आहेत.विनोद साडविलकर यांनी स्व.रूग्णमित्र जितेंद्र तांडेल व मकरंद राजम यांच्या रूग्णसेवेच्या योगदानाला अभिवादन करून व तीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू राहाण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शक तक्ता व योजनांची माहिती दिली व हेच रूग्णसेवेचे कार्य समिती नेमून सुरू राहण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली.
सुभाषजी गायकवाड (नागेबाबा परिवार-अहमदनगर),हेमंत लोणकर(माऊली मेडिकल अॅन्ड चॅरि.ट्रस्ट),राम चव्हाण(विमा सल्लागार),दिनेश बैरीशेट्टी(अध्यक्ष- दिशा फाउंडेशन),राजेश म्हात्रे(मुख्याध्यापक-शासकीय आश्रमशाळा(बेटेगाव),राजेंद्र ढगे(वैद्यकीय कक्ष प्रमुख परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठान), चित्रा उबाळे (अध्यक्षा – डिक्की महाराष्ट्र महिला विभाग),श्वेता सावंत (महिला सामाजिक कार्यकर्ता,विरार),अरूणा सावंत(अध्यक्षा-नवप्रवाह फाउंडेशन),आय.बी.सिंग इ.विविध क्षेत्रात कार्य करणा-या मान्यवरांनी सभागृहाला संबोधित केले.स्वरणिका उनो म्युझिकच्या सोफीया जोगराज,अश्विन बोंडन,श्रुती पटवर्धन,डाॅ.शालू छात्रा,सुधीर साहिल यांनी सुमधुर गाण्याने सभागृहाला आनंद दिला.प्रसन्न फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा अष्टीवकर यांचा जन्मदिन केक कापून साजरा करण्यात आला.अजित वहाडणे,विशाल आरेकर,ध्वनिल तामोरे,राजेंद्र टेकाडे,पंकज नाईक,किरण गिरकर,रमेश चव्हाण(ॠतेश चॅरि.ट्रस्ट), सोपानराव साळुंखे,मुकुंदराव मंडलिक,लक्ष्मीकांत साहिल,नविनकुमार पांचाळ,शशीकांत बाईत,शरद रावले,जया छट्टी,दिव्या छट्टी,कांतीलाल खासिया,अशोक करूनगसे,प्रकाश नाईक,मनिषा साडविलकर, विश्वनाथ कदम इ.चीं उपस्थिती लाभली.मुकुंद आचरेकर व माऊली मेडिकल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वृध्दाश्रमाला वस्तूरूपी भेट दिली.नोंदणी व वाहन व्यवस्थापनाचे काम श्रध्दा अष्टीवकर,सुमेध जाधव,हेमंत लोणकर यांनी उत्तमरित्या पार पाडले.वृध्दाश्रमाचे विश्वस्त जितेंद्र लोके यांनी मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्याबद्दल विनोद साडविलकर यांनी आभार व्यक्त केले.