असलदे मधलीवाडीतील प्रमोद डगरे यांची सहा. पोलीस उपनिरीक्षक पदी निवड!

असलदे मधलीवाडीतील प्रमोद डगरे यांची सहा. पोलीस उपनिरीक्षक पदी निवड!

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

देवगड पोलीस स्थानकात पोलीस हवालदार पदी सेवा बजावीत असलेले मनमिळावू, अभ्यासू पोलीस कर्मचारी प्रमोद नारायण डगरे यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक पदी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने कळविण्यात आले आहे. त्यांच्या या पदोन्नती बद्दल देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक शेखर सावंत, तसेच पोलीस कर्मचारी व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील असलदे गावचे सुपुत्र प्रमोद डगरे हे १एप्रिल १९९१ रोजी बांदा पोलीस स्थानकात रुजू झाले. त्यानंतर वैभववाडी, कणकवली, ओरोस मुख्यालय येथे व त्यानंत देवगड पोलीस स्थानकात त्यांची बदली होऊन पोलीस हवालदार पदी ते सेवा बजावीत आहेत. गेली ३० वर्षे ते पोलीस प्रशासनात सेवा बजावीत असून २ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार त्यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाली आहे. प्रमोद डगरे हे पोलीस सेवेबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट विश्वात धडाकेबाज गुणी खेळाडू म्हणून ही त्यांनी यापूर्वी नावलौकिक प्राप्त केला. क्रीडा रसिकांकडूनही त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!