देवगड:- पडेल-गावकरवाडी येथील श्रीसाईमंदीराचा वर्धापनदिन सोहळा गुरुवार दि. २४ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.
साईपादूका पालखी मिरवणूक, होमहवन मंगलमय विधी, श्रीसत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद व महाप्रसाद (साईभंडारा) असे कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थिती राहून श्री साईदर्शनाचा आणि तिर्थप्रसाद-महाप्रसादाचा लाभ घ्यावा; असे आवाहन श्री साईबाबा तरुण मित्र मंडळामार्फत करण्यात आले आहे.