निर्मळ, निःस्वार्थी, प्रेमळ असणारा गुरु मार्गदर्शक म्हणून समोर येतो तेव्हा नतमस्तक व्हावंच लागतं! असं आदर्शवादी व्यक्तिमत्व म्हणून कॉम्रेड दत्ता खानविलकर अर्थात अण्णा यांना ९३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक गोष्ट मुद्दामहून नमूद करावीशी वाटते; ती म्हणजे अण्णांचे शिक्षण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या शिक्षण संस्थेत अर्थात परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये झाले. त्याचा उल्लेख ते नेहमी आदराने करतात. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे आद्यसंस्थापक, शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर यांनी समर्पित त्यागी जीवनातून उभारलेल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्याने अण्णांसारखा गुरुतुल्य व्यक्तिमत्व जन्मास आले. त्या संस्थेचे क्रियाशील सभासद असल्याचा आम्हाला आपसुकपणेच स्वाभिमान वाटतो आणि चुकीच्या, गैर गोष्टींना विरोध करण्याचे धाडस आमच्यामध्येही येते. असो; अण्णांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
– नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’
https://starvrutta.com/93-year-old-fighting-social-worker-honor-mujra/
९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!
कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात,
ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो,
ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपसुकपणे मनात उत्साह असा निर्माण होतो, जीवनाचे सत्य समजून येते अशा व्यक्ती आपल्या जीवनात येणे सुद्धा परमभाग्य असावं लागतं! असं परमभाग्य मी उपभोगलं आणि उपभोगतोय!
अशा परमप्रिय आदर्शवादी व्यक्तिमत्वाची आज ओळख करून देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दरूपी सुमनांचा लेख…!* (संपूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा!)
– मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’