महाराष्ट्रात अनेक वर्षे मराठा समाजाला इतर मागासवर्गात (ओबीसी) समाविष्ट करण्यासाठी किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जोरदार संघर्ष आणि आंदोलने सुरु आहेत. महाराष्ट्र सरकार सुद्धा क्रियाशील झाले असून आज मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यावेळी एकूण १५४ प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला गेलाय.
अशावेळी क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे-गावडा) समाज बांधव भगिनींना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उचित मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे आम्हाला वाटते. कारण
१) क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाला स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांच्या अतुलनीय कार्याने गावडे-गावडा म्हणून आरक्षण यापूर्वीच मिळालेले आहे. ते आरक्षण टिकविणे फार महत्वाचे आहे.
२) अनेक समाज बांधव भगिनींच्या गावडे-गावडा नोंदी सापडल्याने त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गातून शैक्षणिक आरक्षण प्राप्त झाले असून त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे. मात्र लाखो समाज बांधव भगिनींच्या गावडे-गावडा नोंदी सापडल्या नाहीत. त्यांना मी मात्र सदर आरक्षणाचा लाभ झालेला नाही. ह्याबाबत योग्य ते नियोजन अत्यावश्यक ठरते.
३) लाखो समाज बांधव भगिनींच्या मराठा म्हणून नोंदी आढळतात. त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? आपल्या समाजात `कुणबी’ म्हणून नोंदी आढळल्या आहेत का? असल्यास त्या समाज बांधवांनी काय करायला पाहिजे?
४) मराठा समाज म्हणून आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. त्यावेळी आपण प्रश्नांची नेमकी कोणती उत्तरेत द्यावीत? आपली जात म्हणून गावडे- गावडा जात नमूद करायची का?
५) ज्या समाज बांधव भगिनींना इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण नको आहे त्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ज्यांना आरक्षण हवे आहे त्यांना सहकार्य करायला पाहिजे.
ह्याबाबत स्पष्टता येण्यासाठी आरक्षणाच्याबाबतीत तज्ञ असलेल्या, आरक्षणाच्याबाबतीत मार्गदर्शन करू शकणाऱ्या, आरक्षणाच्याबाबतीत माहिती असणाऱ्या समाज बांधव-भगिनींनी तसेच समाजातील वकिलांनी, उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांनी, निवृत्त उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांनी, ह्याबाबत कार्य करण्याची -सहकार्य करण्याची आवड असलेल्या समाज बांधव भगिनींनी त्वरित संवाद करण्यासाठी एकत्रित यायचे आहे. त्यातून आपण नेमकं काय करायला पाहिजे? ह्याचे नियोजन करता येईल.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे-गावडा) समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांना तो निरंतर मिळत राहावा आणि ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळावा अशी आमची इच्छा आहे! म्हणून ह्या दोन दिवसात शक्य असल्यास सभेचेही आयोजन करण्याचा मानस आहे. तत्पूर्वी आपण खालील लिंकवर क्लिक करून फक्त आणि फक्त आरक्षणाबाबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सामील व्हा! आणि इतर समाज बांधव भगिनींनाही सामील होण्यास सांगा.
सोशल मीडियावर विशेषतः व्हाट्सअँपवर समाज बांधव भगिनींचे अनेक ग्रुप आहेत. त्या ग्रुपवर आपण नेहमीच राजकीय चर्चा जोरदारपणे करीत असतो. समाजबांधव वेगवेगळ्या पक्षाशी – संघटनांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आपलेच समाजबांधव आपआपसात लढाई करताना दिसतात. त्यात माघार कोणीच घ्यायला तयास नसतो. त्यामुळे आपआपसात द्वेष निर्माण होण्यापलीकडे काहीच होत नाही. त्यातून समाजाचं भलं होण्याऐवजी फार मोठं नुकसान होतं. त्याचे खूप दुःख होतं. अशा सर्व खरोखरच विद्वान, चिकित्सक, निःस्वार्थी समाजबांधव भगिनींनी एकत्र येऊ या! आणि आरक्षणाच्याबाबतीत स्पष्ट भूमिका घेण्याबाबत संवाद साधूया!
कृपया https://chat.whatsapp.com/LQzjLtAxpqwHZhdzpg2tbY लिंकवर क्लिक करून KMS OBC Reservation ह्या व्हाट्सअँप ग्रुपवर लगेच सामील व्हा! अट फक्त एकच आरक्षाव्यतिरिक्त कोणतेही मॅसेज, फोटो, व्हिडीओ. ऑडिओ आल्यास ते Delete केले जातील. एवढंच नाहीतर पुन्हा पुन्हा असा प्रकार झाल्यास त्या सदस्याला ग्रुपमधून रिमूव्ह केलं जाईल. आमच्यासह इतर सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना कृपया साथ द्या!
– नरेंद्र हडकर (पत्रकार)
संपादक- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ
https://kmsamaj.org/
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’
https://starvrutta.com/
– सुरेश डामरे
संचालक- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ
https://kmsamaj.org/