सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारे जितेंद्र लोके!

सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारे जितेंद्र लोके!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे- गावडा) समाज बांधव कुठल्याही क्षेत्रात असल्यावर आपली उपयुक्तता सिद्ध करतात. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात तर अनेक समाज बांधव भगिनी जेव्हा यशस्वी नेतृत्व करतात तेव्हा अभिमान वाटतो. असंच एक व्यक्तिमत्व आमच्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे- गावडा) समाजात आहे. त्या व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाही; परंतु त्यांचा आज वाढदिवस असल्याने शब्दरूपी शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच!

फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ ह्या ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणारे आमचे मित्र जितेंद्र लोके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते यशस्वीपणे राबवित असतात. त्यांनी केलेल्या सेवा कार्याची दखल अनेक नामवंत संस्थांनी यापूर्वीही घेतली आहे. मोफत आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम, रूग्णमित्रांची शैक्षणिक सहल असे विविध नाविन्यपूर्ण आणि समाजपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करून फिनिक्स फाऊंडेशनने अर्थात जितेंद्र लोके यांनी आदर्श निर्माण केला आहे.

देवगड तालुक्यातील पडेल गावच्या गावकरवाडीत जितेंद्र लोके यांचे मूळ घर! मात्र त्यांचे बालपण गेले परळ भागात डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या बाजूला असलेल्या सिमेंट चाळीत! अगदी शिशुविकास विकास वर्गापासून एसएससीपर्यंत त्यांचे डॉ. शिरोडकर हायस्कुल येथे झाले. चित्रकलेची विशेष आवड असल्याने त्यांनी शालेय जीवनात त्यात विशेष प्राविण्य मिळविले. इंटरमीडिएट ड्रॉइंग परीक्षेत त्यांचा राज्यातून ४८ वा क्रमांक आला. कलेची आवड पाहून जेजे आर्ट स्कुलमध्ये त्यांना त्यांच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी पाठविले. ते शिक्षण पूर्ण होताच त्यांना जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ग्राफिक्स डिझायनर आर्टिस्ट ह्या पदावर नोकरीची संधी मिळाली. नोकरी करीत असताना त्यांनी समाजसेवेचे कार्य सुरु ठेऊन फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेची स्थापना केली.

जितेंद्र लोके यांचे वडील सुद्धा टाटा मेमोरियल रुग्णालयात व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून काम करीत होते. आईवडिलांच्या संस्काराने सुसंस्कारित झालेले जितेंद्र यांनी सामाजिक भान राखत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जितेंद्र लोके यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून समाजसेवेचे अधिकाधिक कार्य संपन्न होवो; ही सदिच्छा!

संपादक – नरेंद्र हडकर
संचालक – सुरेश डामरे
https://kmsamaj.org

त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल प्रसार-प्रचार माध्यमं नेहमीच घेत असतात. खाली तीन सामाजिक सेवेच्या बातम्या लिंकसह देत आहोत. त्यातून जितेंद्र लोके यांच्या कार्याची थोडीशी ओळख होईल.

https://kmsamaj.org/news-phoenix-foundation-president-jitendra-loke-honored-for-30-years-of-service/
फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानिय जितेंद्र लोके यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

जितेंद्र लोके फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असतात. त्याचबरोबर जागतिक किर्तीच्या टाटा रुग्णालयात त्यांनी गेली ३० वर्षे सेवाभावी वृत्तीने अखंड सेवा केली. त्यासाठी त्यांचा यथोचित सत्कार टाटा रुग्णालय व्यवस्थापनाने ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे अकॅडमी डायरेक्टर डॉ. श्रीपाद बनावली, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. सी. एस. प्रमेश, मुख्य व्यवस्थापक अधिकारी श्री. अनिल साठे यांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. ह्यानिमित्ताने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई ह्या संस्थेने सुद्धा जितेंद्र लोके यांचा यथोचित सत्कार केला. फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांनी केलेल्या सेवा कार्याची दखल अनेक नामवंत संस्थांनी यापूर्वीही घेतली आहे.
————-
https://kmsamaj.org/news-maha-arogya-shibir-organized-by-phoenix-foundation-and-kmsamaj/
फिनिक्स फाउंडेशन व क्षा. म. समाज आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न

मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ नुकतेच डॉ. शिरोडकर समारक मंदिर, परळ, मुंबई येथे संपन्न झाले.

यावेळी फोर्टिस रूग्णालयाच्या टीमने रक्ताच्या विविध तपासण्या, डोळे तपासणी, ईसीजी, हाडांची तपासणी करून महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती व विविध शासकीय योजनेतून लहान-मोठ्या शस्त्रक्रिया इ. सेवा व माहिती शिबिरात देण्यात आली. सदर कार्यक्रमास अग्निशिला मासिकाचे संपादक अनिल गलगली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सुदृढ आरोग्य व्यवस्था व आरोग्य विषयक योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवून शिबीर आयोजित केल्याबद्दल सध्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करून अभिनंदन केले.

डाॅ. सोनाली मणियार (सिनीअर कन्सलटंट,फोर्टीस हाॅस्पीटल) यांनी महिलांसाठी कर्करोग आजार व काळजी दृकश्राव्याव्दारे माहिती दिली. डाॅ.अलका थरवळ, डाॅ.प्रविण बागुल यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा व सुयोग्य डाॅक्टरची निवड यावर मार्गदर्शन केले.

त्यावेळी क्षा. म. समाज संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त व सुकाणू समिती सदस्य तसेच बीजेपी शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी, रूग्ण मित्र धनंजय पवार, रूपेश चॅरिटेबल ट्रस्टचे किरण गिरकर, सह्याद्री मैत्री फाउंडेशनचे संजय पाटील, विवेक मयेकर, जय श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे पंकज नाईक, अनिल गुरव, प्रसन्न फाउंडेशनच्या श्रध्दा अष्टीवकर, आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या अमृता पुरंदरे, मनसेचे उपशाखाध्यक्ष गितेश खेडेकर, ज्योती फाउंडेशनचे मयुरेश कांबळे, अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे प्रसाद मांडवलकर, संघमित्रचे हणमंत शिर्के, स्वराज्य एकता युवा फाउंडेशनचे मंगेश तांबे, रूग्णसेवक जयकिशन डुलगच, एमएलएसचे विद्यार्थी राम पाटील, स्पर्श शेडे इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद साडविलकर यांनी केले.

आयोजक फिनिक्स फाउंडेशनचे जितेंद्र लोके आणि त्यांचे सहकारी विनोद साडविलकर, गीता लोके, विश्वनाथ कदम यांनी सदर मोफत वैद्यकीय शिबीर यशस्वीपणे घेतल्याबद्दल सर्वच थरातून त्यांचे कौतुक होत आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सन्मानिय जितेंद्र लोके अनेकविध समाजसेवेचे उपक्रम राबवित असतात. वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेने हजारो रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले आहेत, आरोग्याचा विविध तपासण्या विनाशुल्क केल्या आहेत. त्याचप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशन वृद्धाश्रम चालविते.
———
https://kmsamaj.org/news-phoenix-foundation-extends-helping-hand-to-chiplun-flood-victims/
फिनिक्स फाऊंडेशनची चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशनचे विश्वस्त जितेंद्र लोके यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणच्या पूरग्रस्तांना अत्यावश्यक औषधांसह विविध जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या. सुमारे ५०० कुटुंबांना त्याचा लाभ झाला असून नेहमीप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

पाचशे कुटुंबियांना प्रत्येकी ५ किलो तांदुळ, ३ किलो डाळ, १ लिटर खाद्य तेल, २ किलो कांदे, २ किलो बटाटा, ३ साबण, पॅराशुट तेलाची १ बाटली, क्रोसीन गोळीचे १ पॅकेट, विक्स बामची १ बाटली, २ सॅनिटरी पॅड, १ बॉक्स मेणबत्ती, १ माचीस बॉक्स, १ बाटली फिनाईल, ५ लिटर पॅकिंगचे पिण्याचे पाणी, बिस्किट्स अशा वस्तू प्रत्येकाच्या घरी जाऊन फिनिक्स फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी दिल्या.

विश्वस्त जितेंद्र लोके फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. मोफत आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम, रूग्णमित्रांची शैक्षणिक सहल असे विविध नाविन्यपूर्ण आणि समाजपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करून फिनिक्स फाऊंडेशनने आदर्श निर्माण केला आहे.

error: Content is protected !!