गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांचा परिचय करून देताना अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की, प्रा. गोपाळराव मयेकर हे डॉ. शिरोडकर हायस्कुलचे विद्यार्थी होते. त्यांनतर त्यांनी डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणूनही कार्य केले.
त्यांचे बालपण मुंबईमधल्या गिरणगावातील करीरोडचा परिसर येथे गेले. त्यांचे कुटुंब गूळवाल्या चाळीत राहायचे. गिरणीत काम करणाऱ्या गिरणी कामगाराचा हा मुलगा गोव्याचा शिक्षणमंत्री झाला. गोव्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी शिक्षणासह पर्यटन, बांधकाम अशी महत्वाची खातीही यशस्वीपणे सांभाळली.
१९७४ ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कॉलेजचे ते प्राचार्य झाले आणि एक आदर्श कॉलेज त्यांनी उभारलं. त्यानंतर त्यांनी मधू दंडवते यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने लोकसभेची निवडणूक लढविली होती; परंतु त्यांचा पराभव झाला होता.
डॉ. शिरोडकर हायस्कुलचे विद्यार्थी म्हणून प्रा. गोपाळराव मयेकर यांचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवास आदर्शवत होता. त्यांना क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रा. गोपाळराव मयेकर यांच्यावर श्रद्धांजली वाहणारे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://tarunbharat.com/dailynews/1017928
https://www.dainikgomantak.com/goa/goa-professor-gopalrao-mayekar-passes-away