देवगड:- श्री रामेश्वर हास्कूल ज्युनि. कॉलेज आर्टस आणि अध्यापक विद्यालय मिठबांव सांस्कृतिक विकास मंचच्या अध्यक्षपदी माजी विद्यार्थी व क्षा. म. समाज मुंबईचे अध्यक्ष श्री. धर्माजी सोनू गावकर यांची निवड करण्यात आली.
या समयी श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सरपंच श्री भाई नरे, जनशिक्षण चे समन्वयक श्री विलास हडकर, उपाध्यक्ष सुप्रिया रावले, उपचिटणीस अनिल कोठारकर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रशासन श्री एम के लोके, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी वित प्राचार्य भालचंद्र चव्हाण, मुख्याध्यापक आर. आर. राऊत, श्री. मंगेश पारकर, श्री. संकेत जेठे उपस्थित होते.
या सांस्कृतिक विकासमंच मार्फत हायस्कूल, डी.एडच्या सभागृहावर हॉल बांधकाम, इमारत रंग रंगोटी, बोलक्या भिंती, डिजीटल वर्ग, इत्यादी भौतिक सुविधा विद्यार्थी वर्गाला उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या संस्थांच्या माजी विद्यार्थी संघाने, वर्गवार प्रमुखानी, हितचिंतकांनी, शिक्षणप्रेमींनी विलास मंचचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे संपर्क साधून आपली नाव विकास मंचसाठी क्रियाशील कार्यकर्ता म्हणून द्यावी; त्याच्या माध्यमातून संपर्क करू व विद्या मंदिरासाठी हातभार लावू; असे मत अध्यक्ष गावकर यांनी व्यक्त केले.