मुंबई- नाताळच्या सुट्ट्यांचा काळ जवळ येत असल्याने शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवाजी शिक्षण संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेजतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी शिक्षण संस्था, मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल, तळमजल्यातील खुले सभागृह, डॉ. अंकुश शंकर गावडे मार्ग, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष शरद राजाराम फाटक यांनी नागरिकांना या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सुट्टीच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत व्हावी, तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने अधिकाधिक रक्तदाते पुढे यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. अंकुश शंकर गावडे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात युवकांनी, नागरिकांनी आणि संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
