आनंद युवा संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सत्कार्याची प्रसिद्धी योग्य प्रकारे केल्याने रविवार २५ मे २०२५ रोजी आनंद युवा संघातर्फे पाक्षिक ‘स्टार वृत्त’चा विशेष गौरव करीत सन्मान करण्यात आला. परमपूज्य गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रमात झालेल्या चक्री कीर्तन महोत्सवात कीर्तन विद्यालयाच्या प्राचार्या सुप्रसिद्ध जेष्ठ ह. भ. प. सौ. उमाताई तेंडोलकर यांच्या हस्ते पाक्षिक ‘स्टार वृत्त’ला सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह स्वीकारताना संपादक श्री. नरेंद्र हडकर!
त्यावेळी आनंद युवा संघाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ह. भ. प. श्री. नंदादीप वंजारे बुवा, आश्रमाचे मुख्य विश्वस्त निषाद पाटणकर, आनंद युवा संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आश्रमाचे पदाधिकारी व सेवेकरी, भजनी कलाकार, कीर्तनकार, भक्तगण आणि अनेक मान्यवर उपस्थित होते!