क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यप्रवर्तक, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थांचे संस्थापक
शिक्षणमहर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथी विविध ठिकाणी साजरी
विजयदुर्ग:- नाटे येथे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यप्रवर्तक, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थांचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ स्नेहा कथेकर, प्रमुख पाहुणे उपसरपंच पुरूषोत्तम थळेश्री, माजी सरपंच संजय बांदकर, शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी, युवासेना शाखाप्रमुख सचिन बांधकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सुधाकर थळेश्री, दिलीप कथेकर, शिवाजी बांधकर, अनंत बांधकर, संदीप थळेश्री, निळकंठ थळेश्री, विजय थळेश्री, गोविंद बांधकर, अतुल गुळेकर, शशिकांत बावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास फणसेकर यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी डॉ. शिरोडकर यांच्या जीवन चरित्रावर भाषणं केली.
मिठबाब:- मिठबाब क्षा. म. स. शिक्षण संस्था येथे १८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी डॉ. शिरोडकर यांच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विश्राम मुंबरकर, प्रमुख पाहुणे शमसुद्दीन अत्तार, माजी कार्यकारी अधिकारी बी. एस. डगरे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी एम. के. लोके, सहाय्यक कार्यकारी अधिकारी व प्राचार्य भालचंद्र चव्हाण, सरपंच भाई नरे, माजी विद्यार्थी संघ सेक्रेटरी आबा लोके, मुख्याध्यापक आर आर राऊत, सरपंच शीतल खोत, मुख्याध्यापक आकांशा डगरे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कोचरा:- १८ डिसेंबर २०२१ रोजी कोचरा येथे क्षा. म. समाज विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने शिक्षण महर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथी चव्हाटा येथे साजरी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय विठ्ठल फणसेकर यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी समाजातील अनेक जेष्ठ ग्रामस्थ कृष्णा हंजनकर, प्रभाकर कुबल, रामदास हंजनकर, राघोबा हंजनकर, बाळा हंजनकर, अनिल साळगावकर, संदेश गावकर, सुहास हंजनकर तसेच समाजामधील बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या समारंभाचे सूत्रसंचालन राजू हंजनकर यांनी केले.
ठाणे:- क्षात्रकुलोत्प्न्न मराठा समाज मुंबई ठाणे विभागाच्यावतीने गुरुवार १६ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षण महर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथी ‘साईबाबा मंदिर ट्रस्ट’ सभागृह वर्तकनगर ठाणे वेस्ट येथे संध्याकाळी ६.०० वाजता साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन क्षा. म. स. ठाणे विभाग अध्यक्ष राजेंद्र यदुनाथ फाटक (शिवसेनेचे देवगड तालुका संपर्कप्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
या प्रसंगी समाज व मुंबई कार्यकारणीच्यावतीने श्री. धर्माजी गांवकर (अध्यक्ष- क्षा. म. स. मुंबई) यांनी समाज व शिक्षण संस्थाची सद्यस्थितीत प्रगती विशद केली. त्यावेळी कार्यकारणी सदस्य विनोद लोके, ठाणे विभाग सरचिटणीस श्री. महेश शिवाजी लोके उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन क्षा. म. स. शिक्षणसंस्थाचे माजी प्रशासकीय अधिकारी अरुण नरे यांनी केले.
शिरोडा:- येथे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यप्रवर्तक, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या
७३ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानी उदय फणसेकर (सुकाणू समिती सदस्य), प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश पाटील (युवा पुरस्कार विजेते) व्यासपीठावर होते. स्थानिक प्रतिनिधी प्रकाश गावडे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी बी. के. चव्हाण, माजी सरपंच बाबा नाईक, व्यवस्थापक श्री राजेश शिरगावकर त्यावेळी उपस्थित होते.
नालासोपारा:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज (परेल) संस्थेचे संस्थापक कै. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांच्या ७३ व्या पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने नालासोपारा येथे सभेचे आयोजन केले होते.
छ. शिवाजी महाराज आणि कै रामचंद्र शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून सभेची सुरुवात झाली. संस्थेचे विश्वस्त आणि वसई विरार चे सभासद उपस्थित होते. सकल मराठा समाज वसई चे अध्यक्ष विश्वासजी सावंत या सभेस आमंत्रित होते. संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या नेत्यांनी भाषण झाली. विश्वासजी सावंत यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन करत असताना आम्ही देखील मराठा म्हणून तुमच्या सोबत आहोत; असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय फणसेकर होते.
त्यावेळी विश्वस्त अंकुश डगरे, विद्यमान अध्यक्ष धर्माजी गांवकर, ओझोन रुग्णालयाच्या डॉ. दिपाली रामदास शिरोडकर आणि डॉ. गणेश रामदास शिरोडकर, वसई विभाग सकल मराठा समाज अध्यक्ष विश्वास लक्ष्मण सावंत, सरचिटणीस भक्ती जोगल आणि सभासद श्री. प्रकाश डामरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल वराडकर यांनी केले. क्विश्वस्त विश्राम मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजीव नरे आणि गोविंद हडकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.