महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे जेष्ठ नेते, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष, थोर समाज सेवक, निर्भिड पत्रकार, समर्थ वक्ते, अन्यायाविरूध्द रोखठोक विचार मांडणारे, लाडके नेते माननीय कै. प्रभाकरजी गिरकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमीत्त भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन!
कै. प्रभाकर रामचंद्र गिरकर यांनी कोकणचा सागरी किनारा महामार्ग, वैधानिक मंडळाची निर्मिती, कोकणचा अनुशेष, एसटी वाहतूक, कोकणातील बेदखल कुळांचे प्रश्न आदी प्रश्नांवर आंदोलने उभी केली. कोकणच्या प्रश्नांवरून स्वपक्षीय तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना काळे झेंडे दाखवण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. कोकण किनारी महामार्गासाठी सर्वपक्षीय परिषद त्यांनी घेतली. त्यातूनच आताच्या सागरी महामार्गाचा पाया रचला गेला. गेली सहा दशके राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रभाकर गिरकर अखेरपर्यंत भायखळ्यातील छोट्या चाळीत राहत होते.
अशा थोर नेत्याला क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन अर्थात www.kmsamaj.org संकेतस्थळामार्फत विनम्र अभिवादन!
संपादक- नरेंद्र हडकर
मुख्य संचालक- सुरेश डामरे
www.kmsamaj.org