क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे विजय रावले यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर किर्तीवंत केले आहे. ग्रुप मॅनेजर (अभियांत्रिकी) म्हणून ६२ वर्षांच्या वयानंतर निवृत्तीनंतर ते भारतात परतले आणि छंद म्हणून छायाचित्रण करण्याचा निर्णय घेतला. निसर्गात वन्यजीव छायाचित्रण करण्यासाठी बऱ्याच देशांना भेटी दिल्या. त्यांनी लँडस्केप, पोर्ट्रेट आणि ट्रॅव्हल फोटोग्राफी केली आहे.
विनोद रावले हे अमेरिकेच्या फोटोग्राफिक सोसायटी, ग्लोबल फोटोग्राफिक युनियन आणि छायाचित्रण सोसायटी ऑफ इंडिया ह्या जगप्रसिद्ध संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी ४० पेक्षा जास्त देशांतील २०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये-स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
२०१७ ते २०१९ दरम्यान त्यांना १९० पुरस्कार प्राप्त झाले आणि सात वेळा सर्वोत्कृष्ट भारतीय (Entrant Award) प्रवेशाचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांना विविध देशातील खालील नामांकित संस्थांनी पुरस्कार दिले आहेत.
EPSA from Photographic Society of America.
EFIAP from International Federation of Photographic Art.
EFIP from Federation of Indian Photography.
GPU Crown 3 from Global Photographic Union.
A.CPE from Campina Photographic Exhibitions Society
त्यांनी चार आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये-स्पर्धांमध्ये ज्युरी सदस्य म्हणून काम केले.
त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!
-नरेंद्र हडकर