नियम व अटी

१) वयाच्या १६ व्या वर्षानंतर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील कोणतीही कोणतीही व्यक्ती सभासद होऊ शकते!

२) सभासद होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

३) सभासद झाल्यानंतर क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन या नावाचा वापर कुठल्याही राजकीय, सामाजिक व संस्थेच्या निवडणुकीमध्ये करता येणार नाही.

४) क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी-कल्याणासाठी प्रत्येक सभासदाने आपआपल्या परिने क्रियाशील राहिलं पाहिजे. `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार्यात सभासदाने सहभाग घेतला पाहिजे.

५) सभासद मिळाल्यानंतर सभासदाने `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’च्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही; असे कोणतेही कृत्य करू नये.

६) सभासदत्व कोणाला द्यायचे, कोणाला देऊ नये, कोणत्या सभासदाचे सदस्यत्व रद्द करावे- स्थगित करावे याचे सर्वस्वी अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.

७) `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’चे आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्यासंदर्भात `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’च्या संकेतस्थळाचे संपादक श्री. नरेंद्र हडकर (संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त’) यांच्याशी संपर्क साधावा.

८) `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’च्या संकेतस्थळावरील सर्व माहिती, लेख, बातम्या copiright असल्याने ते इतर कोणत्याही ठिकाणी (व्हाट्स अँप, फेसबुक, इस्टाग्राम, ट्विटर वगैरे समाजमाध्यमावर, लिखित साहित्यात वापरण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

९) `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’चे संकेतस्थळ पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. त्यामुळे लिखाण व जाहिरात बाबतीतील सर्वाधिकार पाक्षिक `स्टार वृत्त’चे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक नरेंद्र हडकर यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

error: Content is protected !!